पावबंद

होरपळे पाखरु अग्नित दृष्टांच्या
कशी रे डोळे तुझी अजूनही बंद ?
पेटला वणवा काळजात आईच्या
तरी ही तुझ्या हालचाली मंद

अमानुषता कशी ह्रदयात वसते
अशी कशी रे यांच्या डोळ्यांत धुंद?
उद्योन्मूख स्रिभक्षक वाढते या देशात
कारणीभूत त्याला निंदास्पद निर्बंध

कित्येक पणत्या विजल्या , विजताहेत
न्यायाची राहली बाजू बाजूला
वार्यावर भलताच गुन्हेगारांचा गंध कित्येक सुटले, सुटताहेत निश्चितपणे
असाच का रे तुझा पावबंद?

आधार पितृत्वाचा

रागवलेल्या मनात मातीच्या भिंती
थरथरताना ऊब, ऊन्हात साऊली
मातृत्वाच्या माहेरी आरक्त स्थान
पाषाण म्हणता तुम्ही तीला
ती तर भगवंताची मूर्ती महान

मशालीस्तव मनात ज्योत जागवूनी
तो दाता, घरचा पुढारी
राबतो निष्ठेने, जुना गडी निष्ठेसाठी
जुना प्रवासी, जुन्या दिशा
परी तरंग उठतो मनी कशाचा
त्या उमललेल्या नव्या आशा

हृदयात बंधिस्त पीलांसाठी
चिलखत रक्षिण्या बेजबाबदार
त्याहूनी शतदा मजबूतदार
निर्दयी कसा ! आधार पितृत्वाचा

भगवान गौतम बुदध

तुझ्या औदर्याची दीप्ती
प्रथमदर्शीनी,
वात ह्रदयात आशेची अशी
पेटवूनी गेली

औदासीन्य आयुष्याचे आज
पाणी सोडले त्याच्यावरी
या निर्विकार मनाला ती
उदयुक्त करुनी गेली

तो कोवळा अंशु असो वा
मावळतानाचा संधीप्रकाश
परि तुझ्या सौजन्यशीलाने
विश्व आरक्त करुनी गेली

प्रशंसा तुझी अवीरत
ईश्वरांश विदयमान
अन्वेषण आयुष्याचे करुनी
ही दीप्ती जग जिंकूनी गेली

युधिष्ठिर

न्यायप्रिय, धर्मप्रिय, संयमी तत्त्व
न्यायी तुझ्या नाण्याच्या बाजू दोन
वचनबदध कार्याने असा
सदोदयीतच असे सत्याचा सन्मान

करुनी घाव यक्षाच्या काळजात
उत्तराचे आरक्त बाण
उतरंडीच्या नात्यांमध्ये
माता माद्री, कुन्ती दोघीही समान

दोन्ही जरी ममत्वाच्या सीमारेषा
अखंडित तरी ठेवण्याची जाण
हृदयी तुझ्या न्यायाचा सहवास
म्हणूनच योग्य घटना, योग्य परिणाम

संधिप्रकाशातून सूर्योदय

कालचा शोध आजचा इतिहास,
आजचा शोध उदयाचा इतिहास नक्की बनणार.
सरोजे सारी या देशाची,
चिखलातून अस्तित्व घडवणार.

स्वच्छ, शुध्द असा कार्याचा झरा,
शोकाकुल असतानाही गतिमान तुझे विचार,
स्वदेशी, स्वहीत जपाया देशाचं
सिंहबळावर शिक्कामोर्तब होणार.

पाच वर्षा आधीचा सूर्योदय,
पुन्हा पाच वर्षा नंतर सुवर्णसूर्य निर्मिणार.
खात्रीने अगदी सार्यांचसाठी
संधिप्रकाशातून सूर्योदय होणार.

ध्यानस्त केवड्यासारखा

जोडू पाहता परमाणू 
किनारलेली सारी स्वपने 
छंद दाखवी काळ


उदय आशेचा पूर्वीकडे 
एक मावळताना काळोख


रंगहीन पथसारी
गजबजलेल्या दिशा दाही 
पाऊलवाट एकमेव 
भुरळ घालणाऱ्या बाकी सात


आत्मशक्तीचे होऊन मिलन 
घेऊनि आता धुक्यांचाच आधार 
विजयपथाची पदमजे उदगारली 
हाच तो नेमलेला प्रवासी


स्वप्नांचा किनारा आशेची होडी 
उत्सूकतेच्या मनात लहरी


तो हि तिथे ध्यानस्त 
गंधावुनि कसा केवड्यासारखा